Posts

मराठी भाषा आणि आधुनिक तंत्रज्ञान

 कोणतीही भाषा ही जर टिकून ठेवायची असेल, तिचा विकास साधायचा असेल तर तिच्या विकासासाठी आधुनिक व अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून घेतला पाहिजे. दैनंदिन जीवनात आपला भाषेशी वेगवेगळ्या कारणास्तव नित्य संबंध येत असतो. आपण ती कामे टाळू शकत नाहीत. उदाहरणार्थ- टंकलेखन, मुद्रण, पुस्तकातील एखाद्या कागदावरील मजकूर पुन्हा मुद्रित करणे, भाषांतर करणे, कठीण शब्दांचे अर्थ जाणून घेणे, अशा कामांसाठी आपण जुन्या पद्धतीचे पारंपरिक तंत्रज्ञान वापरले तर आपले काम अगदी सावकाश होते, कामाला उशीर होतो व एवढा जास्त वेळ या धावपळीच्या काळात अशा कामांसाठी देणे आपल्याला शक् होत नाही. मग कंटाळा आल्याने आपण अशी कामे टाळायला लागतो व हळूहळू ती करणे सोडून देतो. मात्र याच कामासाठी आपले संगणक, लॅपटॉप, स्मार्टफोन, टॅब यांच्यातील आधुनिक तंत्रज्ञानाचा, सॉफ्टवेअर, ॲप्स, संकेतस्थळे यांचा वापर करून घेतला तर ते काम न कंटाळता, अतिशय वेगाने व वेळेत पूर्ण करता येते. तेव्हा या लेखातून आपण अशाच काही ॲप्स व इतर साधनांचा परिचय करून घेणार आहोत. १) vflat ॲप – आपल्याला बऱ्याचदा एखादे पुस्तक, पुस्तकातील काही भाग, पत्र, एखादे परिपत्रक किंवा ...

कुंडलिनी योग

  कुंडलिनी योग             योगाचा उद्देश साधनेतून मोक्ष मिळवणे हा आहे. आपल्या शरीरात जी चित् शक्ती आहे तोच परमतत्त्वाचा अंश म्हणजेच जीवात्मा असे उपनिषदे सांगतात .त्या आत्म्याचे परमात्म्याशी म्हणजेच शक्तीचे शिवाशी किंवा ब्रम्हाचे परब्रम्हशी मिलन, त्यात लो प पावणे म्हणजेच मोक्ष , त्याचा मार्ग योगशास्त्र सांगते. यासंबंधी चर्चा करताना महर्षी पतंजली सुद्धा सांगतात ,"तो परमात्म्याचा अंश म्हणजेच आपल्या शरीरातील चेतनाशक्ती आहे .श्रुती तिलाच प्राण म्हणतात, तो मनाच्या संकल्पाने शरीरात प्रवेश करतो. तो प्राण आनंदस्वरूप ,अजर, अमर व प्रज्ञात्मा आहे. तेच ब्रह्म होय ! कारण हा आत्मा ब्रम्हातून उत्पन्न होतो. सर्व सृष्टी त्याच्यात लय पावते व त्याच्यातूनच निर्माण होते. हे सर्व जगत त्याच ब्रम्हातून निसृत झालेल्या प्राणाचे स्पंदन होय ! माणसामध्ये असलेल्या या ब्रम्हाला म्हणजेच प्राणाला किंवा आध्यात्मिक शक्तीला , कुंडलिनी असे म्हणतात .तिचा आकार सर्पाकृती आहे . सृष्टीची उत्पत्ती झाल्यावर जी शेष शक्ती राहिली , तीच माणसामध्ये कुंडलिनी च्या रूपाने वास करते आणि म्हणूनच ब्रम्हांड ...

चर्चबेल - ग्रेस

 'चर्चेबल ' हा मराठी कवी माणिक गोडघाटे उर्फ ग्रेस यांचा पहिला लघुनिबंध संग्रह होय. इसवी सन 1974 मध्ये त्याची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली. या संग्रहात पस्तीस लेख आहेत. त्यापैकी 34 लेख नागपूरच्या 'तरुणभारत ' च्या साप्ताहिक आवृत्तीत प्रसिद्ध झालेले आहेत . आत्मपर आशय असूनही भावमधुर काव्याची प्रचिती देणारे लेख या संग्रहात आहेत. 'चर्चबेल ' मध्ये ग्रेसच्या अन्य कवितांच्या तुलनेत अधिक सुगमता आहे. आणि लक्षपूर्वक वाचल्यास कवी ग्रेस समजून घेण्यासाठी त्यांचे दलित लेख फारच महत्त्वाचे ठरतील हे लक्षात येते. हे सर्व लेख केरळच्या किनाऱ्यावर असलेल्या चर्च, वसतिगृह, रुग्णालय आणि केरळच्या सभोवतालचा निसर्ग यांच्या सानिध्यातील अनुभव विश्व मांडणारे आहे. कवी ग्रेस यांना मर्ढेकरोत्तर नवकवी असे संबोधले जाते. कविता आणि ललितलेखन या साहित्य प्रकारांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण काम केलेले आहे. चर्च बैल या ललित लेख संग्रहात त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू आपल्याला आढळून येतात. त्यांचे अधिव्याख्याता हे व्यक्तिमत्व तसेच माध्यम स्नेही असलेले त्यांचे कार्यक्षेत्र त्यांच्या दृकश्राव्य प्रतिमा ...

परिपूर्ती-डॉ. इरावती कर्वे

 1. परिपूर्ती या ललित गद्यसंग्रहात इरावती कर्वे यांनी स्त्री जीवनावर भाष्य केले आहे स्पष्ट करा. इरावती कर्वे या सुप्रसिद्ध मानव वंश शास्त्रज्ञ आणि लेखिका आहेत. इरावती कर्वे यांचे परिपूर्ती हे ललित निबंधाचे पुस्तक 1949 मध्ये प्रकाशित झाले. परिपूर्ती मध्ये एकूण 18 निबंध समाविष्ट केलेले आहेत. विषयानुरूप आणि प्रसंगोपात भावभावना आणि चिंतनशीलता यांचा मुक्त गोफ इथे दिसतो. त्यामुळेच व्यक्तीचित्रणे,अनुभवकथन, कथात्म चित्रण आणि तीव्र विचारात्म लेखन इथे एकत्रितपणे पाहता येते. त्यांच्या प्रत्येक लेखात त्यांचे व्यासंग विषय म्हणजे समाजशास्त्र, मानववंशशास्त्र, प्राचीन संस्कृती, आधुनिक जीवनपद्धती या ना त्या रूपात प्रकट झालेले दिसतात. या संग्रहात प्रेमाची रीत, वेड लागलेले घर , जन्मांतरीची भेट, स्त्री व संस्कृती, बीज -क्षेत्र, मारी कुट्टी, गौराई, एकेश्वरी पंथाचा विजय, जुळी मुले, स्त्री राज्य, मराठ्यांचा मोठेपणा , महार आणि महाराष्ट्र, दिक्काल, नव कलेवर, एक प्रयोग, सुप्त इच्छा, वाटचाल, परिपूर्ती हे लेख समाविष्ट आहे. लेखिका इरावती कर्वे स्वतः घेतलेल्या अनुभवाविषयी चिंतन करतात. यातील बऱ्याच लेखांमध्ये...

योग साधना

 योग साधना  विद्यार्थी , युवक हा समाजाचा पाया असतो. तो जेवढा समृद्ध व मानसिक दृष्ट्या भक्कम होईल तेवढा समाजही मानसिक दृष्ट्या स्वस्थ, समृद्ध व निरोगी होतो. आज समाजातील प्रत्येक घटकावर ताणतणावांचा प्रभाव होतो आहे, तसा तो मुलांवरही होतो आहे. समाज व्यवस्थेत तसेच  कुटुंब व्यवस्थेत गेल्या दोन दशकात खूपच स्थित्यंतरे झाली आहेत. त्याचे चांगले- वाईट परिणाम होताना आपण बघत आहोत. ज्यामुळे आज अनेक समस्या मुलांच्या वागण्याबाबत, अभ्यासाबाबत दिसून येतात.  'योग ' ही हिंदू संस्कृतीने जगाला दिलेली एक  अत्यंत महत्त्वाची देणगी आहे. कुठलाही खर्च न करता स्वतःच्या शरीराला निरोगी कसे राखावे,  याचे शास्त्र म्हणजे योग. योगाभ्यासाचे अनेक फायदे आहेत. जीवनशैलीशी निगडित असलेल्या प्रश्नांसाठी योगसाधना  हा उत्तम पर्याय असल्याचे जागतिक पातळीवरील तज्ञांनी पूर्णपणे मान्य केलेले आहे.  आसन, प्राणायाम , ध्यान वगैरे या गोष्टी यात अंतर्भूत होतात. सर्वसाधारणपणे वयाच्या आठव्या वर्षापासून योगा साधनेस सुरुवात करता येते. योगाभ्यासाने विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व विकसित करणे, चारित्र्यसंपन्न पि...