योग साधना
योग साधना
विद्यार्थी , युवक हा समाजाचा पाया असतो. तो जेवढा समृद्ध व मानसिक दृष्ट्या भक्कम होईल तेवढा समाजही मानसिक दृष्ट्या स्वस्थ, समृद्ध व निरोगी होतो. आज समाजातील प्रत्येक घटकावर ताणतणावांचा प्रभाव होतो आहे, तसा तो मुलांवरही होतो आहे. समाज व्यवस्थेत तसेच कुटुंब व्यवस्थेत गेल्या दोन दशकात खूपच स्थित्यंतरे झाली आहेत. त्याचे चांगले- वाईट परिणाम होताना आपण बघत आहोत. ज्यामुळे आज अनेक समस्या मुलांच्या वागण्याबाबत, अभ्यासाबाबत दिसून येतात.
'योग ' ही हिंदू संस्कृतीने जगाला दिलेली एक अत्यंत महत्त्वाची देणगी आहे. कुठलाही खर्च न करता स्वतःच्या शरीराला निरोगी कसे राखावे, याचे शास्त्र म्हणजे योग. योगाभ्यासाचे अनेक फायदे आहेत. जीवनशैलीशी निगडित असलेल्या प्रश्नांसाठी योगसाधना हा उत्तम पर्याय असल्याचे जागतिक पातळीवरील तज्ञांनी पूर्णपणे मान्य केलेले आहे.
आसन, प्राणायाम , ध्यान वगैरे या गोष्टी यात अंतर्भूत होतात. सर्वसाधारणपणे वयाच्या आठव्या वर्षापासून योगा साधनेस सुरुवात करता येते. योगाभ्यासाने विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व विकसित करणे, चारित्र्यसंपन्न पिढी तयार करणे, सुसंस्कारित मन बनविणे, स्मरणशक्ती व केंद्रीकरण शक्ती यामध्ये वाढ वगैरे उद्दिष्ट समोर ठेवावे.
आसनांचे फायदे
1. रोग नाहीसे होतात, स्वास्थ्य मिळते.
2. बैठक स्थिर होते व दृढता प्राप्त होते.
3. मनाची एकाग्रता वाढते. व स्मरणशक्ती वाढते.
4. शरीराला हलकेपणा प्राप्त होतो.व शरीर लवचिक होते.
5.आळस जातो. संपूर्ण दिवसभर ताजेतवाने वाटते.
6. अभ्यासातील भीती दूर होते. आत्म विश्वास वाढतो.
7. नैराश्य दूर होते.
8. सहजतेने ध्यान व चिंतन करता येते
Comments
Post a Comment