मराठी भाषा आणि आधुनिक तंत्रज्ञान
कोणतीही भाषा ही जर टिकून ठेवायची असेल, तिचा विकास साधायचा असेल तर तिच्या विकासासाठी आधुनिक व अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून घेतला पाहिजे. दैनंदिन जीवनात आपला भाषेशी वेगवेगळ्या कारणास्तव नित्य संबंध येत असतो. आपण ती कामे टाळू शकत नाहीत. उदाहरणार्थ- टंकलेखन, मुद्रण, पुस्तकातील एखाद्या कागदावरील मजकूर पुन्हा मुद्रित करणे, भाषांतर करणे, कठीण शब्दांचे अर्थ जाणून घेणे, अशा कामांसाठी आपण जुन्या पद्धतीचे पारंपरिक तंत्रज्ञान वापरले तर आपले काम अगदी सावकाश होते, कामाला उशीर होतो व एवढा जास्त वेळ या धावपळीच्या काळात अशा कामांसाठी देणे आपल्याला शक् होत नाही. मग कंटाळा आल्याने आपण अशी कामे टाळायला लागतो व हळूहळू ती करणे सोडून देतो. मात्र याच कामासाठी आपले संगणक, लॅपटॉप, स्मार्टफोन, टॅब यांच्यातील आधुनिक तंत्रज्ञानाचा, सॉफ्टवेअर, ॲप्स, संकेतस्थळे यांचा वापर करून घेतला तर ते काम न कंटाळता, अतिशय वेगाने व वेळेत पूर्ण करता येते. तेव्हा या लेखातून आपण अशाच काही ॲप्स व इतर साधनांचा परिचय करून घेणार आहोत. १) vflat ॲप – आपल्याला बऱ्याचदा एखादे पुस्तक, पुस्तकातील काही भाग, पत्र, एखादे परिपत्रक किंवा ...